January 30, 2023

लोकसभा अध्यक्षांचा उद्धव ठाकरे यांना धक्का !

लोकसभा अध्यक्षांचा उद्धव ठाकरे यांना धक्का !

नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंना गटनेता म्हणून मान्यता दिली आहे. मंगळवारी शिंदे गटाच्या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली होती.त्यांना दिलेल्या पत्रानंतर ओम बिर्ला यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

लोकसभा अध्यक्षांच्या भेटीदरम्यान 12 खासदारांनी निवेदनही दिले होते. त्यावेळी आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे खरे अनुयायी आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी लोकसभा अध्यक्षांनी या १२ खासदारांच्या स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे राहुल शेवळे यांची लोकसभेतील पक्षनेता म्हणून निवड झाली तर भावना गवळी यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. शिंदे गटाची मोठी मागणी लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मिशन दिल्ली यशस्वी केले आहे. शिवसेनेचे हे 12 खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना जाऊन भेटले आणि पत्र दिलं. या पत्रात राहुल शेवाळे यांची लोकसभेत गटनेता म्हणून तर भावना गवळी यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड व्हावी, अशी मागणी केली होती. ही मागणी आता लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शेवाळे यांना गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोदपदी मान्यता दिल्यामुळे शिवसेनेचे उरलेले 6 खासदार अडचणीत आले आहेत. शिवसेनेच्या या 6 खासदारांना लोकसभेत भावना गवळी यांचा व्हिप मान्य करावा लागेल. या 6 खासदारांनी व्हिप मान्य केला नाही तर त्यांच्यावर कारवाईदेखील होऊ शकते. 12 जानेवारी 1988 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि जून 2019 मध्ये लोक जनशक्ती पक्षाच्या गटनेतेपदाबद्दलचा लोकसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य धरण्याचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या आधारे लोकसभेत शिवसेना गटनेतेपदी राहुल शेवाळे यांच्या नियुक्तीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे.

आता लोकसभेत शिंदे गट वेगळा स्थापन झाला आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शेवाळे यांना गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोदपदी मान्यता दिल्यामुळे शिवसेनेचे उरलेले 6 खासदार अडचणीत आले आहेत. शिवसेनेच्या या 6 खासदारांना लोकसभेत भावना गवळी यांचा व्हिप मान्य करावा लागेल.या 6 खासदारांनी व्हिप मान्य केला नाही तर त्यांच्यावर कारवाईदेखील होऊ शकते

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click