नवी दिल्ली- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपल्यासोबत सेनेचे बारा खासदार असल्याचं दाखवून देत उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला. अडीच वर्षांपूर्वी जे व्हायला हवं होतं ते आपण महिनाभर पूर्वी केलं अस सांगत त्यांनी आपलीच शिवसेना खरी असल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणल्यानंतर दिल्लीत जाऊन शिवसेनेच्या तब्बल बारा खासदारांना सोबत घेत आपण योग्य मार्गावर असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले.दिवसभर खासदारांसोबत बैठक घेत पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली.
या पत्रकार परिषदेला गटनेते खा राहुल शेवाळे,प्रतोद खा भावना गवळी,खा हेमंत पाटील,खा ,हेमंत गोडसे,खा कृपाल तुमाने, खा धैर्यशील माने,खा सदाशिव लोखंडे, खा मंडलिक आदि हजर होते.
आपलाच गट अधिकृत असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.