नवी दिल्ली – भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. जगदीप धनखड हे एनडीए आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली आहे.
दिल्लीत पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठकी चर्चेअंती धनखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले. भाजप मुख्यालयात पार पडलेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. याच बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जगदीप धनखर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले
71 वर्षीय जगदीप धनखर हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे माजी नेते आहेत. जानेवारी २०२२ आतापर्यंत, ते पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम करत आहेत. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत आणि १९८९ ते १९९१ मध्ये लोकसभेचे सदस्य होते
धनखर यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थान राज्यातील किठाना या छोट्या गावात झाला. धनखर यांनी किठाणा गावच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपले शालेय शिक्षण सैनिक स्कूल, चित्तौडगढ येथून पूर्ण केले आणि त्यानंतर राजस्थान विद्यापीठ, जयपूरमधून पदवी प्राप्त केली