August 16, 2022

पेट्रोल,डिझेल चे दर कमी !नगराध्यक्ष थेट जनतेतून !!

पेट्रोल,डिझेल चे दर कमी !नगराध्यक्ष थेट जनतेतून !!

मुंबई- राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केल्याने आता पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी कमी होणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.त्याचसोबत नगराध्यक्ष, सरपंच यांची निवड जनतेतून होणार आहे.

देशात मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती.आता आपण पेट्रोल पाच आणि डिझेल तीन रुपयांची दर कपात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीच्या दिवशीच इंधनदर कपात करणाऱ्या असल्याची घोषणा केली होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने पेट्रोल डिझेल VAT कमी केला आहे. त्यामुळे आता पेट्रोल प्रती लिटर पाच रुपये डिझेल प्रतीलिटर तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click