August 16, 2022

श्रीलंकेत आणीबाणी ! हिंसाचार वाढला !

श्रीलंकेत आणीबाणी ! हिंसाचार वाढला !

नवी दिल्ली- श्रीलंकेतील राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आणि पंतप्रधान राजपक्षे हे पळून गेल्यानंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर कोलंबो मध्ये हिंसाचार वाढला आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या पलायनामुळे श्रीलंकेत पुन्हा एकदा हिंसक निदर्शने पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. हे लोक संसदेच्या दिशेने कूच करत आहेत. दुसरीकडे, संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. आंदोलकांनी लष्कराचे वाहनही अडवले आहे. दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे देशातून पळून मालदीवमध्ये पोहोचले आहेत. श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाने गोटाबाया यांच्या जाण्याला दुजोरा दिला आहे.

संरक्षण अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की राजपक्षे यांनी काल रात्री त्यांना विमानासाठी विनंती केली होती. राजपक्षे हे राष्ट्रपती म्हणून संरक्षण दलांचे सर्वोच्च कमांडर आहेत. पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या कार्यालयानेही राष्ट्रपतींनी देश सोडल्याची पुष्टी केली आहे.
कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांचे भाऊ बासिल राजपक्षे यांना पळून जाण्यास भारताने मदत केल्याच्या वृत्ताचे खंडन केले. उच्चायुक्तांनी हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे आणि भारत श्रीलंकेतील लोकांना पाठिंबा देत राहील असेही म्हटले आहे.

एएफपीनुसार, असा दावा केला जात आहे की, स्थानिक अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आज पहाटे लष्करी विमानातून देशातून पलायन केले. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्यानंतर शेजारील देश मालदीव मध्ये गेल्याचा दावा एएफपीच्या अहवालात करण्यात आला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click