बीड- ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत नव्याने निवडणूक जाहीर करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गट आणि गणाची आरक्षण सोडत रद्द करण्यात आली आहे.त्यामुळे गावच्या कारभारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांचा हिरमोड झाला आहे.
राज्यातील ओबीसी समाजाला दिलेले आरक्षण रद्द झाल्यावर याबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फजय निवडणूक आयोगाने प्रभाग रचना जाहीर केली अन त्यानंतर राज्यातील92 नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर केला होता.
दरम्यान मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय नगर परिषद निवडणूक घेण्याचे आदेश दिले तसेच आफक्षणाचा विषय निकाली निघेपर्यंत पुढील निवडणूक प्रक्रिया सुरू करू नये असे आदेशदिले.
सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या आदेशामुळे 13 जुलै रोजी पासून सुरू होणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत आता पुढे ढकलण्यात आली आहे.19 जुलै रोजी ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल .