December 10, 2022

गोव्यातही शिंदे पॅटर्न ! काँग्रेसचे दहा आमदार भाजपकडे !!

गोव्यातही शिंदे पॅटर्न ! काँग्रेसचे दहा आमदार भाजपकडे !!

पणजी – महाराष्ट्रात सत्तांतर नाट्य घडल्यानंतर आता गोव्यात देखील राजकिय भूकंप घडणार आहे.गोवा काँग्रेसचे अकरा पैकी दहा आमदार बाहेर पडून भाजपसोबत जाणार आहेत.सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ला हा मोठा धक्का बसला आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना (Shiv Sena) पक्षानंतर आता गोव्यातील (Goa) काँग्रेस पक्ष (Congress) धोक्यात आहे. गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून काँग्रेस आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि अपक्ष अशा 50 आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा राज्यातही राजकीय भूकंप होणार आहे. काँग्रेसचे 11 पैकी 9 ते 10 आमदार भाजपात विधिमंडळ गटात विलीनीकरण करण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

भाजप श्रेष्ठींकडूनही यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येत आहे. आज गोव्यातील राजकीय हालचाली गतीमान झाल्या असून सायंकाळपर्यंत 9 ते 10 आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवार 11 जुलैपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शनिवारी या हालचालींचा सुगावा लागल्यानंतर काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव यांनी तातडीने याची दखल घेतली. त्यांनी आमदारांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यासह अन्य 9 काँग्रेस आमदार असे एकूण दहा जणांचा गट भाजपात विलीन करण्याबाबत ठाम असल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click