बीड – बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसह राज्यातील 92 नगरपालिका आणि चार नगरपंचायत च्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत 22 जुलैपासून 28 पर्यंत उमेदवारी अर्ज भरताना येणार असून चार ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत तर 18ऑगस्ट रोजी मतदान होईल आणि निकाल 19 ऑगस्ट रोजी लागतील असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या मात्र ओबीसी आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढल्यानंतर निवडणूक आयोगाने प्रभाग रचना सुरू केली होती त्यानंतर शुक्रवारी निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपालिका आणि चार नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड गेवराई माजलगाव अंबाजोगाई परळी आणि धारूर या सहा नगरपालिकांचा समावेश आहे
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत 22 जुलैपासून ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरता येणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 28 जुलै आहे 29 जुलै रोजी छाननीनंतर 4 ऑगस्ट पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष मतदान होईल आणि 19 ऑगस्ट रोजी नगरपंचायतीवर कोणाचा झेंडा असेल हे चित्र स्पष्ट होईल त्यामुळे आता भावी नगरसेवक जोराने कामाला लागल्याचे चित्र राज्यात दिसून येईल