March 30, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार बॅटिंग !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार बॅटिंग !

मुंबई- राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठरावावर बोलताना शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार,शरद पवार ,उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत जोरदार बॅटिंग केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी खंबीरपणे पाठीशी राहण्याचा शब्द दिला.तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी रात्री अपरात्री असलेल्या संपर्कामुळेच आपल्याला ही संधी मिळाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनमोकळ्या भाषणाने सभागृहातील वातावरण हलके फुलके झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात फुल बॅटिंग केली. मला उपमुख्यमंत्री करणार होते. ही वस्तुस्थिती होती. पण अजितदादांनी सांगितलं शिंदे नको म्हणून. मी कोणत्याही पदाची लालसा केली नाही. करणार नाही. अजितदादा एकदा सुधीर जोशी, मनोहर जोशी यांचा किस्सा सांगत होते. त्यावेळी ते म्हणाले, अहो, तो अपघात होता. त्यांना मी बाजूला घेऊन विचारलं. तेव्हा ते म्हणाले. आम्ही तुमच्या नावाला कधी विरोध केला नाही. तो तुमच्या पक्षाचा निर्णय होता. फडणवीस शिवसेना उपमुख्यमंत्रीपद देणार होते. गडकरी साहेब भिवंडीत आले होते. फडणवीस म्हणाले, संधी चांगली मिळेल. मी काही रिअॅक्शन दिली नाही. ते पद आम्ही घेणारच नाही. कारण ते मला द्यावं लागेल म्हणून. मी व्यक्त झालो नाही. मी गप्प झालो, असं शिंदे म्हणाले.

तुम्ही म्हणाला एमएसआरडीचं खातं दिलं. चांगलं खातं द्यायचं होतं. पण ते खातं देण्याचं काम यांचं नव्हतं. समृद्धीचं काम फडणवीसांनी दिलं. तेव्हा माझे पुतळे जाळले गेले. एकदा तर विमान क्रॅश होता होता वाचलं. मोपलवार तर देवाचा धावा करत होता. विमानात बसलो पायलट सरदारजी होता. विमान खाली वर होत होतं. त्याने थंब केला होता. त्याला म्हटलं आता काय ढगात गेल्यावर करतो. तो म्हणाला, आधीच विमान अहमदाबादला लँड झालं. त्यामुळे ढगात घुसलो, असं शिंदे यांनी सांगताच सभागृहात एकच खसखस पिकली.

ठाणे महापालिका सभागृह नेता झाल्यावर मी मागे वळून पाहिलं नाही. माझं सभागृह नेत्याचं दालन रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असायचं. मी खूप मेहनत केली. त्यावेळी लेडीज बारचा सुळसुळाट होता. तेव्हा पैशाची उधळण सुरू होती. मी पोलिसांना अनेकदा पत्रं दिली. आयाबहिणी सांगायच्या संसार उद्ध्वस्त होतोय. १६ लेडीजबार मी तोडले. माझ्या विरोधात पिटीशन टाकली. त्यावेळी गँगवार होत होता. मला ठार मारण्याचा प्लॅन होता. तेव्हा आनंद दिघेंना सांगितलं. तेव्हा त्यांनी शेट्टी लोकांना बोलावलं आणि सांगितलं एकनाथ को कुछ हो गया तो समज जाव. त्यानंतर मी वाचलो, असं त्यांनी सांगितलं.

आनंद दिघेंचा मृत्यू झाला. तेव्हा मी कोलमडून गेलो. तेव्हा लोकांचा उद्रेक झाला. हॉस्पिटल तोडलं. लोक बेभान झाले होते. मी तिथे नसतो तर सिलेंडर स्फोट होऊन शंभर एक लोक मेले असते. त्यावेळी शंभर लोकांना अटक झाली. तेव्हा पोलिसांना सांगितलं हा उद्रेक आहे. जाणूनबुजून केलेली कृती नाही. ठाण्यातून शिवसेना संपली असं वाटत होतं. बाळासाहेबांनाही तसं वाटत होतं. दिघेंच्या आशीर्वादाने आम्ही ठाणे पालघर जिल्हा राखला, असंही ते म्हणाले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click