December 6, 2022

भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष !

भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष !

मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे आ राहुल नार्वेकर यांची निवड झाली.महाविकास आघाडीचे राजन साळवी यांचा नार्वेकर यांनी पराभव केला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना भाजपचा हा पहिला मोठा विजय मानला जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.त्यानंतर शिवसेना भाजपच्या या नव्या सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी आणि अध्यक्षांची निवड करण्यासाठी रविवार सोमवारी दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या सर्व आमदारासोबत फेटे बांधून विधींमंडळात दाखल झाले. त्यानंतर विद्यमान उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अध्यक्ष पदाच्या निवडीचा प्रस्ताव सभागृहात मांडला.

राहुल नार्वेकर यांची 164 मतांनी निवड झाली, त्यामुळे राजन साळवी यांना 107 मते पडली.एमआयएम,समाजवादी पक्ष आणि काही अपक्ष हे तटस्थ राहिले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click