मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात शपथ घेतली.दुपारी राज्यपालांना भेटल्यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आपण कुठलेही पद घेणार नाही असे म्हटले होते मात्र दिल्लीतून सूत्र हलली आणि संध्याकाळी शिंदे यांच्यासोबत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आलेल्या भूकंपानंतर भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.राजभवनात झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
दुपारी फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी सांगितले होते की शिंदे हे मुख्यमंत्री असतील.या घोषणेनंतर राज्य भाजप आणि फडणवीस समर्थकांमध्ये खळबळ उडाली होती.
दरम्यान सायंकाळी शपथविधी सोहळा पार पाडण्यासाठी निमंत्रित पाहुणे राजभवनात जमा झाले.त्यावेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.