मुंबई – राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी साडेसात वाजता शपथ घेतील अशी माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेच्या शिंदे यांना भाजप आणि अपक्ष साथ देतील अशी माहिती त्यांनी दिली.भाजपने हा निर्णय घेऊन सर्वानाच मोठा धक्का दिला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली.त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.
गेल्या अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेसोबत आम्ही सत्ता स्थापन करणार होतो. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणे पसंत केले.त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांची भेट घेतली.