August 16, 2022

सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेला दणका !

सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेला दणका !

नवी दिल्ली- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी विश्वास दर्शक ठराव मांडण्याचा दिलेला आदेश रद्द करावा अशी मागणी करणारी शिवसेनेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही,अगोदर विश्वास दर्शक ठरावावर स्थगिती नाही असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यपालांनी गुरुवारी ठाकरे सरकारला विश्वास दर्शक ठराव घेण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने 12 जुलै पर्यंत बंडखोर आमदारांच्या याचिकेवर निर्णय होणार नसल्याचे म्हटले होते.त्यानंतर राज्यपालांनी हे आदेश दिल्याने त्याला शिवसेनेने आव्हान दिले होते.तब्बल साडेतीन तास वादी प्रतिवादी आणि राज्यपाल यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.त्यामुळे आता उद्या महाविकास आघाडी सरकारची अग्निपरीक्षा होणार आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click