मुंबई – राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली.या भेटीत त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने त्यांना विश्वास दर्शक ठराव सादर करण्यास सांगावे अशी मागणी करण्यात आली आहे,याबाबत राजभवनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल 52 आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यात राजकिय भूकंप आला.या प्रकरणी गेल्या आठवड्यात शांत असलेल्या भाजपने आता एक्शन मोड मध्ये येत हालचाली सुरू केल्या आहेत.
भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रात्री साडेनऊ नंतर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली.तब्बल अर्ध्या तासापेक्षा जास्तवेळ या दोघात चर्चा झाली.भाजपने यावेळी राज्यातील परिस्थितीची माहिती राज्यपाल यांना दिली.
यावेळी भाजपने राज्यात महाविकास आघाडीमधील 52 आमदारांनी सरकारवर अविश्वास असल्याचे स्पष्ट दिसत आहे,त्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे.म्हणून राज्यपालांनी सरकारला विश्वास दर्शक ठराव मांडण्यास सांगावे अशी मागणी करणारे पत्र दिले आहे.