August 16, 2022

बंडखोरांना न्यायालयाचा मोठा दिलासा !

बंडखोरांना न्यायालयाचा मोठा दिलासा !

नवी दिल्ली- राज्यातील बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच शिवसेना आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.आज म्हणजे सोमवारी होणारी अपात्रतेची कारवाई 11 जुलै पर्यंत स्थगित करण्यात आली आहे.आता या प्रकरणात 12 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.तसेच न्यायालयाने सुनील प्रभू,नरहरी झिरवाळ, अजय चौधरी यांना नोटीस दिली आहे.

एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 12 जुलै रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर आता विधानसभा उपाध्यक्षांना शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार का, याबाबत लवकरच सुप्रीम कोर्ट निर्देश देण्याची शक्यता आहे. सध्या याबाबत युक्तीवाद सुरू आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष थेट सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे गट आणि विधानसभा उपाध्यक्ष, शिवसेनेच्या वकिलांमध्ये मोठा युक्तिवाद झाला. या युक्तिवादाच्या दरम्यान काही खटल्यांचा दाखला देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर तब्बल एक ते दीड तास यावर दोन्ही बाजूनी युक्तिवाद करण्यात आला.या निकालामुळे शिंदे अँड कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click