December 10, 2022

शिवसेना बाळासाहेब विरुद्ध शिवसेना !

शिवसेना बाळासाहेब विरुद्ध शिवसेना !

मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाने नवं नाव निश्चित केलं आहे. २२ जूनपासून शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीत असून, तेथे पुढील निर्णय घेतले जात आहे. मागील काही दिवसांपासून फक्त आमदारांकडून भूमिका स्पष्ट केल्या जात आहे.दरम्यान, शिंदे गटाचं नाव निश्चित झालं आहे. शिवसेना बाळासाहेब असं नव्या गटाचं नाव असणार आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे.तब्बल 38 आमदारांचे समर्थन शिंदे यांना असल्याने त्यांनी महाविकास आघाडी विरुद्ध एल्गार पुकारला आहे. गेल्या चार दिवसापासून राज्यातील सरकार हादरले आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाने गुवाहाटी मधून सगळी सूत्र हलवण्यास सुरवात केली आहे.तर दुसरीकडे शिवसेनेने देखील या बंडखोर आमदारांवर कारवाई साठी एक पाऊल पुढे टाकले आहे.विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे याबाबत मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान बंडखोर नेत्यांनी शिवसेनेचा वेगळा गट निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.शिवसेना बाळासाहेब अस नव्या पक्षाच नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता या गटावर कारवाई होणार का,ही लढाई आता न्यायालयात जाणार का?राज्याच्या राजकारणातील हे अस्थिरतेचे वातावरण कधी कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click