August 16, 2022

बंडखोर आमदारांवर कारवाई !

बंडखोर आमदारांवर कारवाई !

मुंबई- बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर कारवाई करण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नोटीस बजावली आहे अशी माहिती खा अरविंद सावंत यांनी दिली.सोमवारी याबाबत स्वतः हजर राहून आपलं म्हणणं मांडावे अशी नोटीस बजावली आहे.त्यामुळे राज्यातील सेना विरुद्ध शिंदेंसेना हा सामना अधिकच रंजक होणार आहे.

शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे यांच्यासह 52 आमदार गुवाहाटी येथे रवाना झाले आहेत. यातील शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे केली होती.

याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तब्बल सहा तास उपाध्यक्ष झिरवाळ यांच्यासोबत बैठक घेतली.या बैठकीनंतर खा अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना या सर्व 16 आमदारांना नोटीस बजावण्यात येईल अशी माहिती दिली.

शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांची कोंडी करण्यास सुरुवात केल्याने आता शिंदे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click