मुंबई- राज्याचे बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार हे लक्षात घेऊन भाजपने दोन दिवस अगोदरच मोठी खेळी केल्याचे समोर आले आहे.विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावरच अविश्वास ठराव दाखल असल्याचा दाखला देत दोन अपक्ष आमदारांनी शिवसेनेला चेकमेट दिला आहे.आता यावर काय होणार हे लवकरच स्पष्ट होईल.
महेश बालदी आणि विनोद अग्रवाल असं या दोन आमदारांची नावं असून ते भाजप गटातील असल्याचं समजतंय.ज्यांनी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे.
दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यानंतर आता दोन अपक्षांनी हे पत्र लिहिलं असून त्यांनी या पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांचा संदर्भ दिला आहे. एखाद्या विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांविरोधात जर अविश्वास प्रस्ताव आणला गेला असेल तर त्यांना सदस्यांच्या अपात्रतेविरोधात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं या पत्रात नमूद केलं आहे. त्या आधी अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना हा प्रस्ताव मंजूर करुण घ्यावा लागतो आणि त्या नंतरच त्यांना सदस्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार असतो असं या पत्रात म्हटलं आहे.
विधानसभा नियम 169 अन्वये विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला असून त्यांना आता आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेता येणार नाही असं या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे जर
एकनाथ शिंदे यांचा गट जर अपात्र ठरला तर राज्यातले सत्तांतर होणार नाही. त्यामुळे आपल्यावर अपात्रतेची कारवाई होणार याची माहिती असल्यानेच एकनाथ शिंदे गटाने घेतला आहे. आता ही गोष्ट न्यायालयात जाण्याची शक्यता असून त्यावर कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.