मुंबई- राज्याचे नगरविकास मंत्री आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाची केवळ राज्यात किंवा देशातच नाही तर जगातील बहुतांश देशात सध्या सेनेच्या या एकनाथाची चर्चा आहे.पाकिस्तान, सौदी,दुबई या देशात सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याबाबत सर्च केला गेला आहे.
शिंदे-ठाकरे मधील हा ‘सामना’ कोण जिंकणार, याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. ‘एकनाथ शिंदे कोण आहेत’ असा सवाल देशभर विचारला जात आहे. देशात महाराष्ट्रातील राजकारणाची चर्चा सुरु आहे.
शिंदेबाबत देशातच नव्हे तर पाकिस्तान, सौदी या देशांमध्येही उत्सुकता आहे. तीन दिवसापासून गुगुलवर ‘एकनाथ शिंदे’ सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदेंविषयी अधिक माहिती नसल्याने गुगलवर त्यांच्याविषयी माहिती, व्हिडिओ, बातम्या अनेक जण सर्च करीत आहेत.
देशभरात शिंदेंचा तीन दिवसांतील सर्च ट्रेंड ६४ टक्के एवढा राहिलाआहे. ही संख्या १० लाखांपेक्षा अधिक आहे. पाकिस्तान, सौदी या देशांमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी शिंदेंविषयी माहिती सर्च केली आहे.
एकनाथ,शिंदे, उद्धव ठाकरे, शिवसेना या घडामोडी महाराष्ट्राशी संबंधित असल्याने उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्या तुलनेत देशात शिंदेंचा सर्च ट्रेंड ६४ टक्के आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिलंय. शिवसेनेत झालेल्या बंडामुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे. २१ जूनला हे बंड पुकारण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे सगळे आमदार गुवाहाटीमध्ये गेले आहेत.