July 7, 2022

धमक्या कोणाला देता – शिंदे यांचा सेनेला इशारा !

धमक्या कोणाला देता – शिंदे यांचा सेनेला इशारा !

मुंबई- बंडखोर बारा आमदारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने करताच मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ‘कोणाला धमक्या देतात,आम्ही कायदा जाणतो’अस म्हणत सेनेवर पलटवार केला आहे.त्यामुळे सेना विरुद्ध शिंदे हा संघर्ष अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेचे आ अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पिटीशन दाखल करत एकनाथ शिंदे यांच्यासह बारा बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर या कारवाईला सडेतोड उत्तर दिले आहे.

शिंदे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की,

कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.
यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत.कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click