July 7, 2022

बंडामागे भाजप ! काकांचा आरोप तर पुतण्याचा नकार !!

बंडामागे भाजप ! काकांचा आरोप तर पुतण्याचा नकार !!

मुंबई – राज्याच्या राजकारणातील भूकंप हा भाजपनेच घडवून आणल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला,हे सांगताना पवार यांनी बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका व्हिडीओ चा आधार सांगितला.एकीकडे काका भाजपचा हात असल्याचं सांगत असताना दुसरीकडे पुतण्या अजित पवार यांनी मात्र या सत्तासंघर्षांमागे भाजप असेल असे आपल्याला वाटत नाही असे म्हटले आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मतभेद आहेत की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते ,मंत्री एकनाथ शिंदेंनी आमदारांच्या बैठकीत बोलताना म्हटले की,थेट भाजपचं नाव न घेता आपल्याला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं सांगताना दिसून येत आहे. यात ते आपल्याला कुठेही कुठेही काही लागलं तरी कमी पडणार नाही, असा शब्द राष्ट्रीय पक्षाने दिल्याचेही सांगताना दिसत आहे. आता फक्त एकजुटीने राहयचं आहे. या राष्ट्रीय पक्षाने पाकिस्तानलाही पाकिस्तानला धडा शिकवलाय असेही शिंदे या व्हिडिओमध्ये सांगत आहे. दरम्यान, काही वेळापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदेंच्या बंडात भाजपचा हात अजून तरी दिसत नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनंतर शिंदेचा हा व्हिडिओ समोर आला आहे

शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्याचे तसेच शिंदे जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल याला सर्व उपस्थित आमदारांनी हात वर करून अनुमोदन दिले.

आपण कोणासोबत जायचे याबाबत त्यांनी थेट भाजपचे नाव जरी घेतलेले नसले तरी, देशातील एक राष्ट्रीय पक्ष असल्याचे तसेच हा पक्ष काहीच कमी पडू देणार नसल्याचे शिंदे आमदारांना सांगतांना दिसत आहेत. त्यावर तानाजी सावंत यांनी साहेब, तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू असे म्हणाताना दिसून येत आहेत.

अजित पवार याबाबत बोलताना म्हणाले, आताच्या घडीला कोणताही भाजपचा नेता तिथं येऊन काही करतो असं काही दिसत नाही. त्यावर पत्रकारांनी भाजप नेत्यांची नाव सांगितली तर अजित पवार म्हणतात मी मोठा नेता म्हटलं असे म्हणत त्यांनी भाजपचा यामागे हात नाही, असेच जाहीर करून टाकल्यासारखे आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक भाजप नेते तिथे दिसून होते. सर्वात आधी भाजप आमदार संजय कुटे हे तिथं दिसून आले. त्यानंतर मोहित कंजोब, त्यानंतर गुवाहाटीत पोहोचल्यावर आसामचे मुख्यमंत्री असे अनेक नेते हे बंडखोर आमदारांच्या भेटीगाठी घेताना दिसून आले होते. मात्र एवढे नेते दिसल्यावरही अजित पवारांनी ही शक्यता का नाकारली याही सर्वांना पडलेला प्रश्न आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click