मुंबई- राज्याचे नगर विकास मंत्री तथा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल 45 पेक्षा अधिक आमदार आपल्या बाजूने वळविले नंतर आता महाराष्ट्रातील 18 पैकी 12 खासदार हेदेखील शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे असे झाल्यास केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेच शिवसेनेत राहतात की काय अशी चर्चा होत आहे
महाराष्ट्राच्या राजकारणात भुकंप दोन दिवसांपूर्वी घडला शिवसेनेचे एकनिष्ठ असलेले नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षनेतृत्व विरुद्ध बंड पुकारत थेट सुरत मार्गे गुवाहाटीमध्ये मुक्काम हलवला राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेले सरकार बरखास्त करून पुन्हा भाजपसोबत युती करा या मागणीसाठी शिंदे यांच्यासह तब्बल 44 पेक्षा अधिक आमदार यांनी पक्षनेतृत्व विरुद्ध म्हणजेच सरकार विरुद्ध बंड पुकारलं
एकनाथ शिंदे यांनी आघाडी सरकारमधील अडचणी आणि शिवसैनिक आवर होत असलेला अन्याय आमदार-खासदारांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक या सगळ्या गोष्टींना तोंड फोडल्यानंतर आता सर्वसामान्य शिवसैनिक पासून हे आमदार खासदारांपर्यंत अनेक जण त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा देताना दिसत आहेत शिवसेनेचे महाराष्ट्रात 18 खासदार आहेत या 18 पैकी तब्बल बारा खासदारांनी वेगवेगळ्या प्रकारे एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले आहे
प्राप्त माहितीनुसार शिवसेने मधील तब्बल बारा खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून महाविकासआघाडी सोबत राहिल्याने होणारी अडचण त्यांनी वारंवार पक्षप्रमुखांना बोलून दाखवले आहे आणि आता तेदेखील शिंदे यांची साथ देण्याची शक्यता निर्माण झाली आहे
दरम्यान शिवसेनेचे सावंतवाडी येथील आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह ॥ . सहा ते आठ आमदार हे गुवाहाटी ये.।थे दाखल झाले असून आता शिंदे समर्थक आमदारांचा कडा 45 च्या पुढे गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे