December 10, 2022

अखेर उद्धव ठाकरेंचा राजीनामा !

अखेर उद्धव ठाकरेंचा राजीनामा !

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर अखेर राजीनाम्याची घोषणा केली.लवकरच ते राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा पाठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठाकरे राजीनामा देणार असल्याचे वृत्त न्यूज अँड व्युज ने आज दुपारीच दिले होते,त्यांच्या राजीनाम्याने आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला.त्याचसोबत त्यांनी विधानपरिषद सदस्य पदाचा देखील राजीनामा दिला आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन आपल्याच मुख्यमंत्री विरोधात शड्डू ठोकला नंतर गेल्या दोन दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री काही बोलणार का याकडे जनतेचे लक्ष लागले होते जेव्हा शिंदे परत येत नाहीत असं लक्षात आलं त्यानंतर शिवसेनेने शिंदें सोबत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे प्रयत्न करून पाहिले मात्र त्यातूनही फार काही हाती लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर पाच वाजता बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर राजीनामा दिला.

मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव ठेवला,तसेच उस्मानाबाद चे धाराशिव करण्याचा प्रस्ताव ठेवला. हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यानंतर ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल आल्यानंतर राजीनामा दिला.त्यामुळे राज्यपालांनी गुरुवारी बोलावलेल्या अविश्वास ठराव मांडण्याची गरज पडणार नाहीये.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click