मुंबई – बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चाळीस पेक्षा अधिक सेना आमदार असल्याने सेनानेतृत्वाकडून शिंदे यांना समजावण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्याचे चित्र आहे.त्यामुळे सेना नेते संजय राऊत यांचे ट्विट चर्चेत आले आहे.महाराष्ट्राचा प्रवास विधानसभा बरखासतीच्या दिशेने असे ट्विट राऊत यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या चाळीस आमदारांना आसाम मधील गुवाहाटी येथे हलविण्यात आले आहे.याबाबत गेल्या दोन दिवसापासून शिंदे परत येतील,सरकारला धोका नाही अस म्हणणारे खा संजय राऊत यांचा सूर बुधवारी बदलला आहे.

सकाळी दहा वाजता माध्यमांशी बोलताना शिंदे हे परत येतील अस म्हणणाऱ्या राऊत यांनी 11 वाजून 37 मिनिटांनी एक ट्विट केलं.ज्यामध्ये म्हटलं आहे की,महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने
राऊत यांच्या या ट्विट नंतर सर्वांच्या नजरा दुपारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीकडे लागले आहे.या बैठकीत सरकार बरखास्त करण्यावर चर्चा होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सायंकाळी राजीनामा देतील अशी सूत्रांची माहिती आहे.