नवी दिल्ली- एनडीएने राष्ट्रपतीच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली. एनडीएने महिलांना संधी देणार असल्याचे सांगत आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए विरोधीपक्ष वतीने माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे नाव जाहीर केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एनडीए च्या उमेदवारांची घोषणा केली.
द्रौपदी मुर्मू या सर्वाधिक काळापासून राज्यपाल राहिल्या आहेत.भारताच्या इतिहासात प्रथम महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांना युपीए ने संधी दिली होती.आता एनडीए ने पुन्हा एकदा महिलेला संधी दिली आहे.