मुंबई – बंडखोरी करून सुरत मध्ये निघून गेले नगर विकास मंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून केलेली हकालपट्टी ही बेकायदेशीर असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे आपल्याकडे 35 पेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ असल्याने आपलीच शिवसेना ओरिजनल आहे असेही त्यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले आहे दरम्यान शिंदे हे सायंकाळी राजीनामा देऊन नवा धक्का शिवसेनेला देणार असल्याचे समजते
शिवसेनेचे दिग्गज नेते आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा पवित्रा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या वर्षा या निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक बोलावली शिवसेनेचा 55 आमदारांपैकी केवळ 18 आमदार या बैठकीला हजर होते या बैठकीमध्ये शिंदे यांच्या बंडावर चर्चा झाल्यानंतर आमदार विजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली
एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी झाल्याची माहिती त्यांना मिळतात त्यांनी आपल्या सोबत 35 पेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ असून आपलीच शिवसेना ओरिजिनल असल्याचे सांगत पक्षप्रमुख यांनाच आव्हान दिले आहे एकनाथ शिंदे हे सायंकाळपर्यंत राजीनामा देणार असून त्यानंतर ते आपल्या सहकारी आमदारांसोबत आपलीच शिवसेना ओरिजनल असल्याचा दावा विधिमंडळ सचिव यांच्याकडे करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे
विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. त्यांच्यासोबत पक्षाचे अन्य आमदारांचे फोनही बंद झाले. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाची चिंता वाढली. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना मुंबईत बैठकीसाठी बोलावलं. वर्षा बंगल्यावर दुपारी १२ वाजता ही बैठक होणार होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित आमदारांना मार्गदर्शन केले. परंतु या बैठकीत केवळ १८ विधानसभेचे आमदार उपस्थित असल्याने शिवसेनेला किती मोठा फटका बसला आहे याचा अंदाज येऊ शकतो. परंतु काही आमदार ऑन दे वे असल्याचं पक्षातील नेत्यांनी दावा केला.
वैभव नाईक, उदयसिंह राजपूत, नरेंद्र दराडे, रवींद्र वायकर, मंगेश कुडाळकर, राहुल पाटील, उदय सामंत, प्रकाश फातर्पेकर, दिलीप लांडे, गुलाबराव पाटील, दादा भूसे, संजय पोतनीस, संतोष बांगर, सुनील प्रभू, राजन साळवी, आदित्य ठाकरे, अजय चौधरी, सदा सरवणकर या आमदारांनी हजेरी लावली