मुंबई- शिवसेना नेते तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सरकार राहणार की जाणार ही चर्चा जोर धरत असून येत्या दहा जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची पूजा कोण करणार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस ही चर्चा जोर धरू लागले आहे
शिवसेना नेते तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे एकीकडे शिवसेनेचे नेते शिंदे संपर्कात असल्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे भाजपने शिंदे यांची थेट संपर्क साधून त्यांना अहमदाबादला घेऊन गेल्याची माहिती आहे
विधान परिषदेचे मतदान संपल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन महाराष्ट्रा बाहेर पडले ते थेट सूरत मध्ये दाखल झाले ही माहिती शिवसेना नेतृत्वाला कळेपर्यंत उत्तर रात्र उलटून गेली होती त्यानंतर शिवसेनेत एकच धावपळ सुरू झाली शिंदे भुमरे सत्तार शंभूराजे देसाई हे कुठे आहेत याची शोधाशोध सुरू झाली त्यांच्यासोबत किती आहेत आणि आपल्यासोबत किती आहेत याची आकडेमोड ही सुरू झाली
दरम्यान एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी पुन्हा शिवसेनेसोबत राहावेत यासाठी एक गट प्रयत्न करत असताना दुसरीकडे येत्या दहा जुलै रोजी होणारी आषाढीची वारी चर्चेत आली आहे या आषाढीवारी निमित्त दरवर्षी राज्याचा मुख्यमंत्री हा विठ्ठलाची पूजा करतो पण तोपर्यंत विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पदावर राहणार की पायउतार होणार आणि त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊन विठ्ठलाच्या पूजेला जाणार का अशी चर्चा महाराष्ट्रातील सर्वपक्षीय कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक आणि विठ्ठल भक्तांमध्ये सुरू झाली आहे