मुंबई – राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आस्मान दाखवल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धोबीपछाड दिला आहे.भाजपच्या पाच उमेदवारांना तब्बल 133 मत मिळाली ,म्हणजेच महाविकास आघाडीची 20 मत फुटली आहेत.
राज्याचे लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे.या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना पाहायला मिळाला.राज्यसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे संजय पवार यांना पराभूत केले होते.त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत पुन्हा सेनेचा गेम होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या प्रवीण दरेकर याना 29,श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांना प्रत्येकी 30 तर उमा खापरे यांना पहिल्या पसंतीची 27 मत मिळाली.तसेच भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची 17 मते मिळाली आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनाथ खडसे यांना 29 तर रामराजे निंबाळकर याना 28 मते पहिल्या पसंतीची मिळाली आहेत. शिवसेनेचे सचिन अहिर यांना 26 तर आमशा पाडवी यांना 26 मत मिळाली आहेत,म्हणजेच शिवसेनेची देखील 3 मते फुटली आहेत.
काँग्रेस चे चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीची 22 आणि भाई जगताप यांना 19 मते मिळाली आहेत,याचाच अर्थ काँग्रेस ची देखील 3 मते फुटली आहेत.
भाजपकडे स्वतःची अशी हक्काची 106 मते होती तर 7 अपक्ष आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता,त्यांच्याकडे एकूण 113 मते असताना भाजपच्या अधिकृत पाचही उमेदवारांना मिळून तब्बल 133 मते मिळाली आहेत.म्हणजेच भाजपला 20 मते अधिकची मिळाली आहेत.