मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर सोशल मीडियावरून टिका केल्याप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitle) प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने राज्य पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.स्वतः शरद पवार यांची तक्रार नसताना आणि अदखलपात्र गुन्हा असताना एखाद्या महिलेला महिनाभर कोठडीत कसकाय ठेवले असा सवाल करीत आयोगाने आठ दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
काल केतकी चितळे हिने मुंबई उच्च न्यायालयात आपली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी, अभिनेत्रीच्या अटकेवर, राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्राच्या डीजीपीला नोटीस बजावली असून, मानहानीच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबत आणि प्रत्यक्ष हजर राहण्याबद्दल सात दिवसांत स्पष्टीकरण मागितले होते, त्यावर डीजीपींनी उत्तर पाठवले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी सांगितले की, ‘समन्स पाठवल्यानंतर महाराष्ट्राच्या डीजीपींनी त्यांना कृती अहवाल पाठवला ज्यात केतकीच्या अटकेसह अनेक विसंगती आहेत. प्रकरण अदखलपात्र असूनही दंडाधिकार्यांच्या पूर्व परवानगीशिवाय ते दाखल करण्यात आले होते.’
त्या पुढे म्हणाल्या, ‘अभिनेत्रीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली नाही. बदनामीची तक्रार वैयक्तिकरित्या शरद पवार यांच्याकडून आली नव्हती, ती त्यांच्या पक्षाकडून करण्यात आली होती. जोपर्यंत संबंधित व्यक्तीकडून तक्रार येत नाही तोपर्यंत ती दखलपात्र नसते त्यामुळे कोणत्या कारणास्तव केतकीला अटक करण्यात आली?. हे प्रकरण आता न्यायालयात आहे, पण आता तो पूर्णपणे राजकीय सूड आहे