March 22, 2023

एफआयआर शिवाय चौकशी नाही !

एफआयआर शिवाय चौकशी नाही !

नवी दिल्ली- कोणत्याही प्रकरणात एफआयआर दाखल केल्याशिवाय त्या व्यक्तीला चौकशीला बोलवता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.पंजाब पोलिसांनी दाखल केलेल्या एका प्रकरणात न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे.

सीआरपीसीच्या कलम 160 अंतर्गत पंजाब पोलिसांच्या सायबर सेलने जारी केलेले तीन समन्स रद्द करताना उच्च न्यायालयाने हे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह यांनी यासंदर्भात निकाल दिला आहे. फौजदारी दंड संहितेच्या तरतुदींनुसार तक्रारीची चौकशी करणार्‍या पोलिस अधिकाऱ्याच्या वतीने CrPC च्या कलम 160 अंतर्गत समन्स अथवा सूचना जारी केल्या जाऊ शकतात, परंतु असा तपास सुरू होण्यापूर्वी FIR नोंदवणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

उच्च न्यायालयाने फौजदारी दंड संहितेच्या (CrPC) कलम 160 मधील तरतुदींचा तपशीलवार हवाला दिला आहे. त्याआधारे न्यायमूर्ती सिंह यांनी निकालपत्रात म्हटले आहे की, FIR नोंदवल्याशिवाय तपास सुरू केला जाऊ शकत नाही. तपास कायदेशीर आणि वैध होण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने सीआरपीसीच्या तरतुदींनुसार काम केले पाहिजे. इतकेच नव्हे तर, दंडाधिकाऱ्याला अहवाल न देता प्राथमिक चौकशी करून पोलीस अधिकारी त्याच्या अधिकाराबाहेर काम करू शकत नाही, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

फ्रँकफिन एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक कुलविंदर सिंग कोहली यांच्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी करीत निकाल दिला आहे. कोहली यांनी एका अर्जाच्या तपासात सायबर क्राईम, एसएएस नगर यांनी जारी केलेल्या समन्सला आव्हान दिले होते. या प्रकरणात उच्च न्यायालयाने कुलविंदर सिंग कोहली यांच्याविरुद्ध CrPC कलम 160 अंतर्गत 25 जानेवारी, 25 फेब्रुवारी आणि 9 मार्च 2022 रोजी जारी करण्यात आलेले समन्स रद्द केले आहेत. कुलविंदर सिंग यांनी मोहालीच्या एसएएस नगर येथे असलेल्या पंजाब पोलिसांच्या सायबर सेलने जारी केलेल्या समन्सला आव्हान दिले होते. याचवेळी त्यांनी समन्स रद्द करण्याची मागणी केली होती.

याचिकाकर्ते कुलविंदर सिंग कोहली हे दिल्लीचे रहिवासी असून व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीच्या तपासासंदर्भात पंजाब पोलिसांनी त्यांना सायबर सेल पोलिस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले होते. कोहली यांच्याविरुद्ध राजबिक्रमदीप सिंग आणि त्यांचा मुलगा मुंजनप्रीत सिंग यांनी सोशल मीडियावर बाबा जगरूप सिंग यांच्या मृत्यूबाबत खोटे आरोप आणि ज्योतदीप सिंग यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल तक्रार दाखल केली होती

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click