February 8, 2023

संधी नाही मिळाली म्हणून रडत बसायचं ! हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही – मेटे !!

संधी नाही मिळाली म्हणून रडत बसायचं ! हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही – मेटे !!

बीड- विधानपरिषद निवडणुकीत डावलल्यामुळे नाराज असलेल्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना विनायक मेटे यांनी खोचक टोला लगावला आहे.उमेदवारी मिळाली नाही म्हणून बडबडत बसायचं हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही असा सल्ला मेटे यांनी दिला.

बीफ येथे आयोजित कार्यक्रमात मेटे बोलत होते,ते म्हणाले की,भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा काही येड्या लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. चांगल्या कामासाठी जाताना काही येडे लोकं आडवी येतच असतात. तसेच उमेदवारी नाही मिळाली म्हणून, नाराज होऊन लगेच बाजूला व्हायचं आणि काहीही बडबडत बसायचं, काहीही करायचं, काहीही उपटसुंभ उद्योग करायचे हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही. आमची इमानदारीची औलाद असून, बेमानीची औलाद नाही. एखाद्याला शब्द दिला, हातात हात दिला तर शेवटपर्यंत त्याचा हात सोडत नाही. पाठीत सुरा खुपसणारी आमची औलाद नाही. त्यामुळे देवेंद्र फडणीस यांना आम्ही शब्द दिला आहे की, तुमच्या सोबत शेवटपर्यंत प्रामाणिकपणे असणार असून कुणी असेल किंवा नसेल, असे मेटे म्हणाले.

याचवेळी पुढे बोलताना मेटे म्हणाले की, मित्र जरी असले तरीही कशाला कुणाला काही मागयाच. आपणच आपल्या हक्काची आमदारकी आता 2024 ला मिळवायची आहे. त्यामुळे त्या दिशेने आपल्यलाल काम करायचं असल्याच म्हणत, मेटेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहे. मात्र कोणत्या मतदारसंघातून रिंगणात उतरणार हे यावर मात्र मेटे काही बोलले नाही.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click