March 22, 2023

राज्यसभेसाठी मतदान कसे होते,नेमकी प्रक्रिया काय ?

राज्यसभेसाठी मतदान कसे होते,नेमकी प्रक्रिया काय ?

मुंबई – राज्यसभेची उद्या निवडणूक होत आहे.या निवडणुकीत मतदान कशाप्रकारे केले जाते.मत बाद होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी,काय केल्यास मत बाद होईल याबाबत अनेक प्रश्न सामान्य नागरिकांसह आमदारांच्या मनात देखील आहेत.नेमकं कस असत हे मतदान चला तर मग जाणून घेऊया .

मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदाराला (आमदार) पेन दिला जातो. त्याचाच वापर आमदाराला मतदान करताना करावा लागतो. हा पेन मतपत्रिकेसोबतच दिला जातो.
इतर कोणतंही पेन, पेन्सिल किंवा बॉलपेन अथवा चिन्हांकित करण्याचं कोणतंही साधन यांचा वापर आमदाराने केला तर ती मतपत्रिका अवैध ठरवली जाते.
आमदारांना दिल्या जाणाऱ्या मतपत्रिकेवर उमेदवाराचं नाव आणि त्याच्या पुढे पसंतीक्रम असा रकाना असतो.

आमदाराला प्रथम पसंतीक्रम म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम या स्तंभात १ हा अंक लिहून मतदान करायचं असतं. १ असा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहायचा असतो.
एकापेक्षा जास्त उमेदवार राज्यसभा निवडणूक लढवत असले, तरीही १ हा पसंतीक्रम फक्त एकाच नावासमोर लिहायचा असतो.
निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या संख्येव्यतिरिक्त निवडणूक लढवणारे अनेक उमेदवार असतील आणि पसंतीक्रम ठरवायचा असेल म्हणजे समजा पाच उमेदवार निवडणूक लढवत असती आणि केवळ दोन उमेदवारांना निवडून द्यायचं असेल तर आमदारांना पसंतीक्रमानुसार एक ते पाच या उमेदवारांच्या नावांपुढे दर्शवलेल्या अंकासाठी पसंतीनुसार चिन्हांकन करायचं असतं. (ज्याला पहिली पसंती आहे, त्याला १ क्रमांक अशा पद्धतीने).

आमदार पसंतीच्या उमेदवारांच्या नावासमोर पंसंतीक्रमाचा चिन्हक्रम या रकान्यात २, ३ , ४ असे अंक लिहून उर्वरित उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मत देऊ शकतात.
आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करताना कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर केवळ एकच अंक दर्शवला आहे याची खात्री करून घ्यायची असते आणि एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर तोच अंक दर्शवलेला नाही याचीही खात्री करायची असते.
पसंतीक्रम हा केवळ अंकांमध्येच म्हणजेच १, २, ३ असाच लिहायचा असतो. हा पसंतीक्रम शब्दांमध्ये म्हणजे एक, दोन, तीन असा लिहायचा नसतो.

पसंतीक्रम १, २, ३ या भारतीय संख्याप्रमाणे किंवा I II III या प्रमाणे रोमन स्वरूपात लिहिता येऊ शकतात.
मतपत्रिकेवर नाव किंवा इतर कोणतेही शब्द लिहायचे नसतात. त्याचबरोबर स्वाक्षरी किंवा नावाची अद्याक्षरंही लिहायची नसतात. अंगठ्याचा ठसा उमटवण्यासही मज्जाव असतो. तसं केल्यास ती मतपत्रिका अवैध ठरवली जाते.
आमदाराला पसंतीक्रम दर्शवण्यासाठी कोणतंही चिन्हं किंवा X यासारखे चिन्ह दर्शवणं अयोग्य असतं. अशी मतपत्रिकाही बाद ठरवण्यात येईल.

मतपत्रिका वैध ठरण्यासाठी कोणत्याही एका उमेदवाराच्या नावासमोर १ हा अंक लिहून पसंतीक्रम दर्शवायचा असतो.
पसंतीक्रम म्हणजेच २ किंवा ३ हे लिहिणं आमदारासाठी वैकल्पिक असतं.
पहिला क्रमाक लिहिल्यानंतर दुसरा किंवा त्यानंतरचा पसंतीक्रम दर्शवलाच पाहिजे अशी सक्ती नसते.

१ हा अंक नसलेली पण इतर अंक असलेली.
एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर १ हा अंक लिहिलेला असलेली.

१ हा अंक अशा पद्धतीने दर्शवला गेला असेल की जो नेमका कोणत्या उमेदवाराला लागू होतो याविषयीची शंका निर्माण होत असल्यास, ती पत्रिका बाद ठरवली जाते.
१ आणि २, ३ यांसारखे अंक एकाच उमेदवारासाठी चिन्हांकित केल्यासही मतपत्रिका बाद ठरते.
पसंतीक्रम अंकाऐवजी शब्दांमध्ये दर्शवला असेल तरीही मतपत्रिका बाद ठरते.

ज्याद्वारे मतदार ओळखला जाऊ शकतो असे कोणतेही चिन्ह किंवा लेखी मजकूर असल्यास मतपत्रिका बाद होईल.
निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या पेन व्यतिरिक्त इतर कुठल्याही साधनाने अंक लिहिला असेल तरीही मतपत्रिका अवैध ठरते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click