मुंबई – विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवार उतरवले असून भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे आणि शिवसंग्राम चे विनायक मेटे यांना संधी देण्यात आलेली नाही.मुंडे यांच्याऐवजी माजीमंत्री राम शिंदे यांना परिषदेवर संधी देण्यात आली आहे.
विधानपरिषद च्या दहा जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होत आहे.यामध्ये भाजपच्या वाट्याला 4,राष्ट्रवादी काँग्रेस 2,शिवसेना 2 आणि काँग्रेस च्या वाट्याला दोन जागा येत आहेत.भाजपकडून चार जागेवर कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चा सुरू होती.
भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना यावेळी आशा होती की पक्ष संधी देईल,तसेच विनायक मेटे यांचेही नाव चर्चेत होते.मात्र भाजपने बुधवारी जी यादी जाहीर केली त्यात या दोघांची नावे नाहीत.
भाजपने चार ऐवजी पाच उमेदवार जाहीर केले आहेत,याचाच अर्थ राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद साठी देखील चुरस निर्माण होणार आहे.भाजपने प्रवीण दरेकर,राम शिंदे,श्रीकांत भारतीय,उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना संधी दिली आहे.