परळी – साहस,संघर्ष आणि सेवेचा त्रिवेणी संगम म्हणजे गोपीनाथ मुंडे होते ,मुंडे अन महाजन यांनी भाजप बळकट करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले,आज त्यांचा वारसा त्यांच्या तिन्ही मुली चालवत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे अशा शब्दांत मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्व गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
परळी येथील गोपीनाथ मुंडे येथे आयोजित स्व मुंडे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमास मुख्यमंत्री चौहान हजर होते.व्यासपीठावर प्रज्ञा मुंडे,खा प्रीतम मुंडे,खा सुजय विखे,आ महादेव जानकर,आ सुरेश धस यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी हजर होते.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री चौहान यांनी स्व गोपीनाथ मुंडे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.ग्रामीण भागातून उदयास आलेल्या मुंडे यांच्यासारख्या नेत्याला गरिबांच्या प्रश्नांची जाण होती.गोदावरीला पूर आला तेव्हा मुंडे गोदापत्रात उतरले होते तर दुष्काळात जनावरांच्या छावण्या मध्ये मुक्काम केला होता. सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी आणि विकासासाठी ते सतत कार्यरत होते अस ते म्हणाले.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या कार्यक्रमात पाच कुमारिकांचे पूजन करण्यात आले.