December 6, 2022

मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा !

मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा !

मुंबई – गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेवर यंदा भाजपचा झेंडा फडकण्याची चिन्हे आहेत.सेनेला केवळ 20 ते 30 जागा मिळतील अन 120 ते 130 जागा घेऊन भाजप सत्तेवर येईल असे गणित सट्टा बाजारात मांडले जात आहे.

बीएमसीच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी चार प्रमुख पक्षांमध्ये चुरस आहे. यामध्ये सत्ताधारी भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये 236 जागांसाठी लढतील.2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात जे महाविकास आघाडी सरकार आले अन शिवसेनेने मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले.मात्र त्यानंतर दोन वर्षात पक्षाची झालेली वाताहत पाहता मुंबई महापालिका सेनेच्या ताब्यात राहण्याची सुतराम शक्यता नाही.

निवडणुकीनंतर भाजपला जवळपास 120 जागांवर विजय मिळवण्याची खात्री आहे. सध्याचे ट्रेंड पाहता हा आकडा 130 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बुकी1 रुपया देण्याच्या तयारीत आहेत. BMC निवडणुकीत भाजपने 120 जागा जिंकल्याबद्दल बुकी प्रत्येक एक रुपयाच्या वर 1 रुपया द्यायला तयार आहेत. 100 पेक्षा जास्त जागांवर भाजपच्या विजयावर सट्टा लावण्यासाठी, बुकींना प्रत्येक रुपयावर 0.25 पैसे द्यावे लागतील. 110 जागांसाठी एक रुपयावर 55 पैसे इतकी शक्यता आहे.

शिवसेना बीएमसी निवडणुकीत फक्त 10 ते 30 जागा जिंकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रुपयाला 10 पैशांपासून ते 62 पैशांपर्यंत दर देण्यात आला आहे. तथापि, शिवसेना ४० जागा जिंकल्यास बुकी रुपयावर अडीच रुपये देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना 40 जागा जिंकेल अशी शक्यता बुकींनी वाटत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईला सर्वाधिक तडाखा बसला होता. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेनेसमोर मोठे आव्हान असेल यात शंका नाही.

राज ठाकरेंच्या मनसेला 5 ते 15 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी रुपयावर बुकींची 22 पैशांपासून 85 पैशांपर्यंत रेट देण्याची तयारी आहे. शिवसेनेच्या प्रस्थापित विरोधी लाटेचा फायदा मनसेला होईल, असेल बोलले जात आहे. शिवसेनेकडील काही मते भाजपकडे जातील अशी शक्यता होती, पण आता ती मनसेकडे जातील असेही बुकी म्हणतात. बुकींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कोणताही रेट दिलेला नाही.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click