July 7, 2022

अनिल परब अडचणीत ! ईडीची छापेमारी !

अनिल परब अडचणीत ! ईडीची छापेमारी !

मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.परब यांच्याशी संबंधित पुणे,मुंबई आणि रत्नागिरी येथील सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई आणि पुणे येथील एकूण सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु असल्याचे समजते. ईडीची एक टीम गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता अनिल परब यांच्या अजिंक्यतारा या निवासस्थानी पोहोचली. पोलिस बदल्यांच्या प्रकरणात सचिन वाझेंच्या जबाबात अनिल परब यांचे नाव समोर आले आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, देशमुख, मलिक यांच्यानंतर आता परबांचा नंबर असे सांगत अनिल परब यांनी आता कपड्याची बॅग तयारी ठेवावी, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

अनिल परब यांना चौकशीलाही बोलावले जाणार असल्याचे समजते. अनिल देशमुख प्रकरणात अनिल परब यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणी त्यांची आता चौकशी होणार आहे. अनिल परब यांच्या विरोधात ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापेमारी सुरु केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click