नवी दिल्ली- केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल 10 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे.केंद्राने कर कमी केल्यावर आता राज्य सरकार कर कमी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,राज्य सरकारच्या करांमुळे मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. पण, आम्ही यावेळच्या अर्थसंकल्पात कोणताही नवीन कर लावण्याचा निर्णय घेतलेला नाहीये. उलट गॅसवरचा कर कमी केलाय. साडेतेरा टक्क्यांहून तीन टक्क्यांहून आणला.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या घरगुती गॅस सिलेंडरला 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचं सीतारमण यांनी सांगितलं. योजनेच्या 9 कोटी लाभार्थ्यांना एकूण 12 सिलेंडरपर्यंत ही सबसिडी लागू असेल असेही सीतारामन यांनी सांगितले.