नवी दिल्ली- जून ठिकाणी पाऊस पडत नाही किंवा कमी पडतो त्या ठिकाणी निवडणूक घ्यायला काय हरकत आहे असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बाबत निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून पुढे ढकलण्यात आल्या आहेत.याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
यावर निवडणूक आयोगाने पावसाळा संपल्यावर निवडणूक घेण्याबाबत सांगितले होते,या विषयावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.त्यामध्ये ज्या भागात कमी पाऊस पडतो किंवा पाऊस पडत नाही त्या ठिकाणी निवडणूक घ्यायला काय हरकत आहे असा सवाल केला आहे.
तातडीने याबाबत आढावा घ्यावा अन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता येत्या महिना दोन महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.