May 26, 2022

आमदार , खासदारांकडे लाखोंची थकबाकी !

आमदार , खासदारांकडे लाखोंची थकबाकी !

बीड – सर्वसामान्य ग्राहकाकडे हजार पाचशे रुपयांची थकबाकी असेल तर थेट वीज कनेक्शन कट करणाऱ्या वीज वितरण कंपनी ला आमदार,माजी आमदार आणि खासदारांकडे असलेली लाखोंची थकबाकी मात्र दिसत नसल्याचे चित्र आहे.राज्यातील या पुढाऱ्यांकडे जवळपास दहा ते वीस कोटींची थकबाकी आहे.वीज वितरण कंपनी ने या लोकांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी होत आहे.

राज्यातील सर्वसामान्य ग्राहकापासून ते स्थानिक स्वराज्य संस्था आणि मोठं मोठ्या उद्योगपती, कंपन्यांकडे वीज वितरण कंपनी ची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे.विशेषतः आमदार आणि खासदार यांच्याकडील थकबाकीचे आकडे डोळे फिरवणारे आहेत.

बीडचे आ संदिप क्षीरसागर, खा रजनीताई पाटील, आ प्रकाश सोळंके यांची नावे देखील थकबाकीदारांमध्ये आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील अशा अनेक दिग्गज पुढाऱ्यांची नावे थकबाकीदार ग्राहकाच्या यादीत आहेत.

एकीकडे मार्च एन्ड च्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणाऱ्या वीज वितरण कंपनीने या आमदार,मंत्री,खासदार यांच्यावर कधीच कारवाई केल्याचे दिसलेले नाही.मोठं मोठ्या पुढारी,कंपन्या,उद्योजक यांच्यावर मेहरबानी दाखवणाऱ्या वीज वितरण कंपनी ने या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

राज्यातील ज्या प्रमुख आमदार,खासदार यांच्याकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे त्यामध्ये पुढील लोकांचा समावेश आहे.

औरंगाबाद – हरिभाऊ बागडे (रु. ३१,७२५), सूरज लोलगे (रु. १,१३,२७९), विलास भुमरे (रु. १,५०,९८०)जालना – रावसाहेब दानवे (रु. २१,६७४, रु. ३५,१९७, रु. २५,१९४, रु. १०,०९३, रु. ८०,८३६, रु. ८०,६३२), अमरसिंग खरात (रु. २,४२,२६७), बबनराव यादव (रु. १,०८,६५८)बीड – रजनी पाटील (रु. ३,०७,९८४), प्रकाश सोळंके (रु. २१,१६०, रु. ५९,१७७), संदीप क्षीरसागर (रु. ३४,९७९, रु. ७०,३८७, रु. १,२३,०६४)

लातूर – संजय बनसोडे (रु. ५३,३१९), शिवाजीराव पाटील (रु. १७,९०७, रु. १३,१२२, रु. १९,६७६, रु. १९,६८०), बाबासाहेब पाटील (रु. १,४५,७७५, रु. १९,६८०)उस्मानाबाद – ज्ञानराज चौगुले (रु. ४९,६९८, रु. २६,५०६), मधुकर चव्हाण (रु. ८०,९४८), रवींद्र गायकवाड (रु. ११,०८४, रु. १३,९७०)परभणी – कल्याण रेंगे (रु. १,२७,९६२), सुरेश वरपुडकर (रु. २४,८६१, रु. २०,९२८)

रायगड – नृपाल जयंत पाटील (रु. ३,६०,०३५), मानसी महेंद्र दळवी (रु. २,१६,६४८)ठाणे – दिना पाटील (रु. ३८,७३७), रमेश पाटील (रु. १,१७,९८८)

जळगाव – शिरीष मधुकरराव चौधरी (रु. ६७,९६८), सुरेश भोळे (रु. १,३४,७८८) नंदुरबार – विजयकुमार गावित (रु. ४२,१३१) अहमदनगर – शिवाजीराव कर्डिले (रु. ३८,१५१, रु. ५९,६७०), राहुल जगताप (रु. २८,५४९), रामदास शिंदे (रु. ८२,१४५), बाळासाहेब थोरात (रु. १०,८४९), राधाकृष्ण विखे-पाटील (रु. ११,१५२) नाशिक – भुजबळ वाईन्स (रु. २४,०८८), दिलीप बोरसे (रु. ५७,९३०), संजय चव्हाण (रु. ५७,३२९, रु.२९,८२२), सुहास कांदे (रु. १९,१७६), हिरामण खोसकर (रु. २७,३४७, रु. २९,८२९, रु.२१,९३५)

बुलढाणा – प्रताप जाधव (रु. ६४,२७३, रु. ६५,११०, रु. २२,३३०)अमरावती – रवी राणा (रु. ३८,६७२), यशोमती चंद्रकांत ठाकूर (रु. ८८,२६७), राजकुमार पटेल (रु. ७३,८२०) भंडारा – नाना पटोले (रु. १,३१,१६२, रु ४७,७६२, रु ७१,३२०, रु ४७,१६६)नागपूर – अनिल देशमुख (रु. १,११,८९२, रु. १,२२,७५१), आशिष जैस्वाल (रु. १,३६,६८३, रु. १,९९,०२६), मोहन मते (रु. ३५,४७२)

पुणे – बापूसाहेब पठारे (रु. ३७,०८६), संग्राम थोपटे (रु. ८८,७३०), दिलीप मोहिते (रु. ७७,६६३, रु ८७,१७२, रु. २,६६,०३९)सातारा – जयकुमार गोरे (रु. ७,०३,४७३), महेश शिंदे (रु.६८,१७१ )

सोलापूर – रणजितसिंह मोहिते-पाटील (रु. १४,०५६, रु. १,७१,१६०), प्रभाकर परिचारक (रु. १,११,७२७), राजेंद्र राऊत (रु. ७२,४१९, रु. २,४१,४४५, रु. १०,८७०), बबनराव शिंदे (रु. १०,९२१, रु.११,०७४, रु. १३,९४९, रु. १७,२४२, रु. १०,९२६, रु. १०,९२५, रु. ११,०७२), संजय शिंदे (रु. २७,९४१, रु. ६५,५५६, रु. ५१,३२७, रु. २१,४३४, रु. ९५,९६६, रु.५६,१७८)

कोल्हापूर – संभाजीराजे भोसले (रु. १,२५,९३२), राजेंद्र पाटील (रु.८९,१५०)

सांगली – विश्वजित कदम (रु. २४,०६३, रु. १८,२१०), अनिल बाबर (रु. २४,२२२), दत्तू खाडे (रु. ३७,७४७, रु. २५,७२७, रु. २९,४९२, रु. ३४,६९४, रु. ७९,७१५, रु. ७९,७१५, रु.१,३९,३९५, रु.५१,८६५, रू.४९,८९५), सुमन सदाशिव खोत (रु. ११,८४२, रु. १,२३,५९१), विक्रमसिंह सावंत (रु. १,२७,६६८), शिवाजीराव नाईक (रु. ६२,१४१), सुरेश पाटील (रु. २४,१३७, रु. २४,३५२)

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click