औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राज्यात जाती जातीत विष पेरलं असगी टीका करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरलेच पाहिजेत नाहीतर 4 मे पासून देशभरात हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा दिला.
मुंबई आणि ठाणे येथील सभेनंतर राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेकडे राज्याचे लक्ष लागले होते.राज यांनी या सभेत शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली.
शरद पवार यांनीच जाती जातीत विष पेरलं. यांना सत्तेसाठी जातीयवाद करावा वाटतो,जेम्स लेन च्या विषयात विनाकारण बाबासाहेब पुरंदरे यांना ओढण्यात आलं.पवार त्यावेळी सत्तेत होते,का नाही लेन ला फरफटत आणलं असा सवाल त्यांनी यावेळी केला.
राज्यातील मशिदीवरील भोंग्यामुळे होणारा त्रास अन त्या विरोधात मनसे ने उठवलेला आवाज हा कायम राहील.आम्हाला दंगली घडवायच्या नाहीत मात्र सरकारने ऐकले नाही तर आम्हाला धर्माचे उत्तर धर्माने द्यावे लागेल असा इशारा राज यांनी दिला.