December 10, 2022

जून अखेर जिल्हा परिषद, नगर पालिकेचा रणसंग्राम !

जून अखेर जिल्हा परिषद, नगर पालिकेचा रणसंग्राम !

मुंबई – ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून लांबलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या जुलै अखेर होण्याची शक्यता आहे.राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात ही माहिती दिली आहे.

राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींसह जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या 17 जून ते 11 जुलै या कालावधीत या निवडणूक घेणे शक्य असल्याचे राज्य निवडणूक आयाेगाने सर्वाेच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी आता 4 मे राेजी सुनावणी हाेणार आहे.

राज्य शासनाने 11 मार्च राेजी प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे ठेवणारा कायदा मंजूर केला असून त्याला आव्हान देणारी याचिका पवन शिंदे व इतरांनी ऍड. सुधांशू चाैधरी, ऍड. देवदत्त पालोदकर, ऍड. आडगावकर यांच्यामार्फत सर्वाेच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर न्या. ए. एम. खानविलकर व न्या. अभय ओक यांच्यापुढे 25 एप्रिल राेजी सुनावणी झाली. यावेळी राज्य निवडणूक आयाेगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी शपथपत्र दाखल केले आहे. त्यानुसार काेविड-19 मुळे मागील दोन वर्षांमध्ये निवडणुका घेता आल्या नाहीत. मात्र, राज्य निवडणूक आयाेगाने काेविडच्या पहिल्या लाटेनंतर राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींसह 6 जिल्हा परिषद, 44 पंचायत समितींच्या निवडणुका 2021 मध्ये घेतल्या.

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 106 नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या आहेत. तसेच मुदत संपलेल्या व आगामी काळात मुदत संपणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभाग रचनेचीही तयारी पूर्ण केली आहे व काहींची तयारी प्रगतीपथावर आहे. शपथपत्रात पुढे म्हटले आहे की, राज्यात 3 मार्च 2022 राेजी 2 हजार 155 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्या असून 31 डिसेंबर 2022 पर्यंत 9 हजार 963 संस्थांची मुदत संपेल.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click