नवी दिल्ली – कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशात लवकरच 6 ते 12 वर्षातील मुलांना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.याबाबत डिजीसीआय ने निर्णय घेतला आहे. या वयोगटातील मुलांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं ६ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याला मंजुरी दिली आहे. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
देशात ६ वर्षांवरील मुलांना भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन बायोलॉजिकल ई च्या कॉर्बेव्हॅक्स आणि १२ वर्षांवरील मुलांना या लसींच्या प्रतिबंधित आपात्कालिन वापरास मंजुरी दिली आहे. सध्या १२ ते १४ या वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स ही लस देण्यात येत आहे. १५ ते १८ या वयोगटातील मुलांचं लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करण्यात आलं. त्यांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येत आहे. ६ ते १२ वयोगटातील मुलांचे लसीकरण करताना पहिल्या दोन महिन्यांसाठी दर १५ दिवसांनी आणि नंतर पाच महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला विश्लेषणासह डेटा पुरवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.