January 30, 2023

राज्यपालांच्या व्हायरल पत्राने खळबळ !

राज्यपालांच्या व्हायरल पत्राने खळबळ !

मुंबई – राज्यातील राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा प्रश्न प्रलंबित असताना मंगळवारी टीव्ही माध्यमातून एक पत्र व्हायरल झाले अन राज्याच्या राजकारणात जणू भूकंप झाला.माध्यमांनी कोणतीही खात्री न करता हे पत्र व्हायरल केलं ज्यात राज्यपालांनी स्वतः सहा जणांची विधानपरिषद सदस्य म्हणून शिफारस केल्याचा उल्लेख होता.हे पत्र व्हायरल झाल्यानंतर राजभवनाला याबाबत खुलासा करावा लागला.मात्र यातून इलेक्ट्रॉनिक मीडिया किती उथळपणा करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

काही वेळापूर्वीच एक पत्र टीव्ही माध्यमांमध्ये येऊन धडकलं. हे पत्र राज्यपालांनी उद्धव ठाकरेंनी लिहिल्याचं यात दिसतं आहे. त्यात असा उल्लेख करण्यात आला आहे की महाराष्ट्र विधान मंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या रिक्त झालेल्या जागी सहा नावं सुचवल्याचा उल्लेख आहे.

वीरभद्रेश करबसप्पा बसवंती, रमेश कोकाटे, सतीश घरत, संतोष अशोक नाथ, मोरेश्वर भोंडवे, जगन्नाथ पाटील या सहा नावांची शिफारस करण्यात आल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यांनी २० वर्षातील उल्लेखनीय योगदान पाहता त्यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस करीत आहे. आपण राज्य मंत्रिमंडळाच्या सहमतीने नावाचा प्रस्ताव सादर करावा. असं या पत्रात म्हटलं गेलं आहे. मात्र या पत्रात अनेक चुका आहेत ज्या बातमी चालवताना टीव्ही माध्यमांनी लक्षातच घेतलेल्या नाहीत.

पत्रावर २९ सप्टेंबर २०२० ही तारीख आहे.राज भवन, मलबार होल असा उल्लेख करण्यात आला आहे

या दोन प्रमुख चुकांकडे दुर्लक्ष करून या पत्रावरून बातमी करण्यात आली आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या नावे असलेलं हे पत्र इतकं व्हायरल झालं की ही बातमी टीव्ही माध्यमांनी केली. त्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ माजली. अखेर या प्रकरणी राज भवनाला खुलासा करावा लागला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click