मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड आणि परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना छातीत त्रास जाणवू लागल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे रुग्णालयात दाखल झाले असून मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी सायंकाळी छातीत त्रास जाणवू लागला.त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील तातडीने रुग्णालयात दाखल झाले.तेथील डॉक्टर मंडळींशी टोपे यांचे बोलणे झाले आहे.डॉक्टर मंडळींनी मुंडे यांना आठ दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.मुंडे यांच्या प्रकृती बाबत अद्याप अधिकृत पणे रुग्णालयाने कोणतीही माहिती दिलेली नाही .