मुंबई – देशातील खाजगी रुग्णालयात उद्यापासून कोविशील्ड आणि कोवॅक्सिंन चे बूस्टर डोस उपलब्ध झाले असून किंमत देखील कमी करण्यात आली आहे. अवघ्या 225 रुपयात बूस्टर डोस मिळणार आहे.
खासगी रूग्णांलयांसाठी कोविशील्ड (covishield) आणि कोव्हॅक्सिच्या तिसऱ्या बुस्टर डोसासाठीचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यानुसार ही लस खासगी रूग्णांलयांना केवळ 225 रुपयात मिळणार आहे. याआधी कोविशील्ड लस खासगी रूग्णालयांना 600 रुपये प्रति डोस देण्याचे सांगण्यात आले होते. तर भारत बायोटेकसाठी 1200 रुपये प्रति डोस एवढी किंमत जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता यामध्ये बदल करण्यात आला असून, यासाठी खासगी रूग्णालयांना केवळ 225 रुपये प्रति डोस मोजावे लागणार आहेत
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डच्या बुस्टर (buster) डोससाठी नागरिकांना खासगी रूग्णालयांना प्रतिडोस 600 रुपये मोजावे लागतील, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी शुक्रवारी सांगितले होते. त्यानंतर आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता खासगी रूग्णालयांना कोविशील्डच्या प्रति डोससाठी 600 ऐवजी केवळ 225 रुपये प्रति डोस इतकी किंमत मोजावी लागणार आहे.
कोविशील्ड पाठोपाठ भारत बायोटेकच्य़ा कोव्हॅक्सिन लसीच्या डोसच्या किमतीदेखील कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार कोव्हॅक्सिनच्या प्रति डोससाठी खाजगी रुग्णालयांना 1200 रुपयांऐवजी 225 रुपये मोजावे लागणार आहे, अशी माहिती कंपनीच्या संयुक्त संचालक सुचित्रा एला यांनी सांगितले.