मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि ईडीच्या कोठडीत असलेले नवाब मलिक यांना दिलासा मिळालेला नाही.त्यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.गेल्या दीड महिन्यापेक्षा अधिक काळापासून मलिक हे कोठडीत आहेत.
मुंबई बॉम्बस्फोट मधील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्या भावाकडून आणि बहीण हसीना पारकर यांच्याकडून मुंबईत कवडीमोल भावाने जमीन खरेदी करत टेरर फंडिंग केल्याचा आरोप मलिक यांच्यावर झाला होता.
त्यांच्यावर सक्त वसुली संचालनालय ने पहाटे पहाटे छापा घालत अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर मलिक यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती.
मलिक यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता 18 एप्रिल पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश पीएमएलए कोर्टाने दिले आहेत.