माजलगाव – तालुक्यातील बाराभाई तांडा येथील भारत रामराव राठोड या भारतीय सैन्य दलातील जवानांचे उपचारा दरम्यान निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बाराभाई तांडा येथील भारत राठोड हे 2012 साली भारतीय सैन्य दलात भरती झाले.सुरवातीचे ट्रेनींग नागपूर येथे घेतल्यानंतर त्यांची नियुक्ती जम्मू काश्मीर येथे झाली होती.कर्तव्यावर असताना काही दिवसांपूर्वी राठोड हे आजारी पडले.त्यांना उपचारासाठी पुण्यात दाखल केले होते.उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचे पार्थिव गावाकडे आणण्यात आले असून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.