April 1, 2023

शिवसेनेचे डिपॉझिट जप्त !

शिवसेनेचे डिपॉझिट जप्त !

गोवा – ज्या ज्या भागात शिवसेनेचे युवराज अर्थात मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रचार केला तेथील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.गोव्यात एकीकडे भाजप ने मागील वर्षीच्या तुलनेत 7 जागा अधिक मिळवत बहुमताचा आकडा गाठलातर दुसरीकडे शिवसेना उमेदवार मात्र सपशेल अपयशी ठरले.शिवसेनेच्या उमेदवारांपेक्षा जास्त मते नोटा ला मिळाली आहेत,त्यामुळे इतर राज्यात निवडणूक जिंकण्याचे शिवसेनेचे स्वप्न अपुरेच राहिले आहे.

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी गोव्याचा दौरा केला होता. आदित्य यांनी चार मतदारसंघात शिवसेनेचा प्रचार केला. या चारही मतदारसंघात शिवसेनेचा धुव्वा उडाला आहे. विशेष म्हणजे या चारही उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला दुपारी १ पर्यंत अडीचशे मतांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.

उत्तर प्रदेश  – भाजप 275,सपा 123             गोवा – भाजप 20,काँग्रेस  11      उत्तराखंड – भाजप 48,काँग्रेस 19   मणिपूर – भाजप 33 काँग्रेस 5       पंजाब – आप 91,काँग्रेस 19

आदित्य ठाकरे साखळी, वास्को, पेडणे, म्हापसा मतदारसंघात प्रचाराला गेले होते. आदित्य यांनी प्रचारसभा घेतल्या, भाषणं केली. काही ठिकाणी डोअर टू डोअर प्रचार केला. मात्र तरीही शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार झाला. विशेष म्हणजे या ठाकरेंनी प्रचार केलेल्या चारही मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

आदित्य ठाकरेंनी प्रचार केलेल्या मतदारसंघात काय स्थिती?
साखळी मतदारसंघ

प्रमोद सावंत, भाजप- ११५६१ मतं
धर्मेश सगलानी, काँग्रेस- १११७५ मतं
सागर धारगळकर, शिवसेना- ९७ मतं
नोटा- २७८ मतं

वास्को मतदारसंघ
कृष्णा साळकर, भाजप- ११,६५४ मतं
जोस अल्मेडा, काँग्रेस- ८२०४ मतं
मारुती शिरगावकर, शिवसेना- ४९ मतं
नोटा- २१३ मतं

पेडणे मतदारसंघ
प्रविण आर्लेकर, भाजप- १२६१४ मतं
राजन कोरगावकर, काँग्रेस- ९३२६ मतं
सुभाष केरकर, शिवसेना- २२२ मतं
नोटा- ३६१ मतं

म्हापसा मतदारसंघ
जोशुआ पीटर डिझुझा, भाजप- ९६४२ मतं
सुधीर कांदोळकर, काँग्रेस ७५५९ मतं
जितेश कामत, शिवसेना- ११९ मतं
नोटा- २८४ मतं

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click