नवी दिल्ली- देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश सह पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाचे कल हळूहळू स्पष्ट होत आहेत.उत्तरप्रदेश, गोवा,उत्तराखंड सह मणिपूर देखील भाजपने बहुमताने ताब्यात घेतल्याचं चित्र आहे.तर पंजाब मध्ये आम आदमी पार्टी ने काँगेसवर झाडू फिरवत तब्बल 90 जगावर आघाडी घेतली आहे.
देशाच्या पंतप्रधान पदाचा मार्ग ज्या उत्तरप्रदेश मधून जातो त्या राज्यात पाच वर्षांपूर्वी भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापण केले होते.त्यानंतर योगी यांनी दंगामुक्त यूपी,सुशासन आणण्याचा प्रयत्न केला होता.
गेल्या पाच वर्षात झालेली विकासकामे पाहता पुन्हा योगी सत्तेवर येतील असा अंदाज सर्वच सर्व्हे दाखवत होते.मात्र गुरुवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सकाळी साडेदहा नंतर जे कल दिसून आले त्यात भाजपने 402 पैकी 300 जगावर आघाडी घेतली आहे.समाजवादी पार्टी ने मागील 47 वरून थेट 90 वर आघाडी घेतली आहे.
मणिपूर सारखे राज्य भाजप ने ताब्यात घेतले आहे.येथे भाजपने 34 जगावर आघाडी घेतली आहे.उत्तराखंड येथे भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे.या ठिकाणी भाजप 50 जागेवर आघाडीवर आहे.गोव्यात गतवर्षी पेक्षा जास्त चांगली कामगिरी भाजपनं केली आहे.गोव्यात भाजपने 23 जागांवर आघाडी घेतली आहे.
एकमेव सत्ता असलेल्या पंजाब मध्ये काँग्रेस चा सफाया आम आदमी पार्टी नेकेला आहे.117 पैकी तब्बल 90 जागेवर आप ने आघाडी घेतली आहे.