March 30, 2023

मोदींनी जिंकली पुणेकरांची मने !

मोदींनी जिंकली पुणेकरांची मने !

पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो चा प्रवास करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरवात मराठीत केली.छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात आज येण्याचे मला भाग्य लाभले असे म्हणत त्यांनी मेट्रोमुळे पुण्याच्या विकासात भर पडेल असा विश्वास व्यक्त केला.

पुणे मेट्रो चे उदघाटन केल्यानंतर मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की,आधी भूमिपूजन व्हायचं मात्र उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही. पण, . सध्याच्या काळात भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात.
21 व्या शतकातील शहरांच्या गरजा आणि विकास लक्षात घेऊन सरकार धोरण आखत आहे. सरकार अधिकाधिक ई-वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देत आहे.

अत्याधुनिक पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रियेची व्यवस्था, बायोगॅस प्लांट, स्मार्ट एलईडी बल्बचा अधिक वापर व्हावा यासाठीच्या धोरणांवर सरकारकडून काम सुरू
शहरातील नागरिकांनी वर्षातून किमान एकदा नदी उत्सव साजरा करावा. या महोत्सवात नदी प्रति असलेली श्रद्धा व्यक्त करता येईल. त्याशिवाय नदी, पर्यावरणाचे महत्त्व आदीचे सांगता येईल. यानिमित्ताने जनजागृती मोहीम राबवता येईल
पुण्याची ओळख ग्रीन फ्यूल सेंटर म्हणून निर्माण होत आहे.


काही वेळापूर्वी मी मेट्रोने प्रवास केला. ही मेट्रो प्रवास सोपा करेल, प्रदुषणापासून मुक्तता करेल. कोरोना साथीदरम्यानही मेट्रो सेवेसाठी तयार आहे. आपल्या देशात गतीने शहरीकरण होत आहे. 2030 पर्यंत आपली शहरी लोकसंख्या 60 कोटींच्या पार जाईल. ही लोकसंख्या अनेक संधी प्रमाणेच आव्हानेही घेऊन येते. शहरात निश्चित सीमेमध्येच फ्लायओव्हर बनू शकतात. अशामध्ये आपल्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे मास ट्रान्सपोर्टेशन.. त्याची अधिकाधिक निर्मिती करणे होय. त्यासाठी आमचं सरकार काम करत आहे. 2014 पर्यंत देशात फक्त दिल्ली NCR मध्येच मेट्रोचा विकास झाला होता. आज देशात दोन डझनाहून अधिक शहरांमध्ये मेट्रो एकतर सुरु झालीये अथवा तीचं काम सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रात पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, ठाणेमध्ये मेट्रोचा विस्तार होत आहे. मेट्रोने प्रवास करण्याची सवय लावून घ्या. तुम्ही जितका प्रवास मेट्रोमधून कराल.तेवढी तुम्ही आपल्या शहराची मदत कराल.असे नरेंद्र मोदी म्हणाले.

परदेशातील कच्च्या तेलाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इथेनॉलचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.या धोरणामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल
सरकारांमधील समन्वयाच्या अभावी योजना रखडतात. या योजना पूर्ण होतात तेव्हा तेव्हा त्या कालबाह्य झालेल्या असतात. पीएम नॅशनल गती योजना प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. प्रकल्प वेळेवर पूर्ण होणे आवश्यक

समाजातील सर्व घटकांनी मेट्रोने प्रवास करावा. मेट्रोतून प्रवास करणे तुम्ही स्वत: च्या शहराला एक प्रकारे मदत करत असतात.येणाऱ्या काळामध्ये मेट्रो रेल्वेचे महत्त्व आणखी वाढणार आहे. देशभरात मेट्रोचे जाळं विस्तारत असून महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे असेही मोदी म्हणाले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click